दासबोध
वीस दशक दोनशे समास असलेला हा रामदास स्वामी यांचा अध्यात्म आणि व्यवहार सांगणारा प्राचीन ग्रंथ आहे. प्रत्येकी दहा अध्यायांचा एक समास बनला आहे. सामान्य माणसाला "खड़े मांडून सिकविला ओम नामा जेवी " या उक्तीने नराचा नारायण बनविणारा विचार यात आहे.
रामदास स्वामी याना प्रत्यक्ष्य श्री रामचन्द्र यांचा अनुग्रह होता. स्वामी सम्पूर्ण भारतभर तीर्थाटन करून भारतीय जनतेची वैचारिक व आध्यात्मिक उन्नति करण्यासाठी वेद वेदांत उपनिषदे गीता भागवतादी पुराणचा उहापोह या ग्रन्थाद्वारे सुरस पद्धतीने करत आहेत
हा ग्रन्थ गुरु शिष्य यांच्यातील संवाद आहे. त्या मुळे शिष्य साहजिक प्रश्न विचारत आहे. व सदगुरु श्री रामदास स्वामी महाराज त्या प्रश्नाची आध्यात्मिक व संसारिक उतरे देत आहेत. त्यामुळे सम्पूर्ण ग्रन्थ पहिल्या वाचल्या शिवाय ग्रन्था विषयी स्व -मते निर्माण करू नयेत.
हा ग्रन्थ सार -"जगी पाहता सत्य हे मृत्यु भूमि (मनाचे श्लोक ) किंवा "मरणाचे स्मरण असावे हरी भक्तिस सादर व्हावे " व आसार- (आत्मज्ञानवीना पार्थ सर्व कर्म निर्थकम् - पांडव गीता ) विचार आणि नित्यानित्य विवेक यांचा उहापोह करीत आहे.
माणूस अध्यात विचारा शिवाय बद्ध म्हणजे संसारिक बन्धनात बांधलेला असतो. पण संत संगत व सांसारिक अपघात यामुळे मानवी जीवनाकड़े बघन्याचा दृष्टिकोण बदलून सार-आसार काय असावे हा विचार करू लागतो. या अवस्थेस मुमुक्षु म्हणतात. मुमुक्षु अवस्था साधक अवस्थेत परिवर्तित होते, या काळात गुरु मार्गदर्शनाची नितांत गरज असते. गुरुनी सांगितलेल्या विचार आचरणाने साधक सिद्ध बनतो. या बद्ध-मुमुक्षु-साधक-सिद्ध अवस्थेतील परिवर्तनासाठी नवविधा भक्ति कशी आहे. कर्म, उपासना,ज्ञान आणि मुक्ति यांचा संयोग सदगुरुच्या विचाराद्वारे कसा प्राप्त होतो. सद्वस्तु दाखविणारा तो सदगुरु साक्षात परमेश्वर आहे. व त्यानी सांगितलेल्या मार्गाने जाणारा भक्त हा संसाररूपी विभक्ति पासून दूर होऊंन गुरुरूपी सूर्याशी एक होतो. गुरु शिष्य एक होता काळाशी नाटोपति सर्वथा, इतरांची ते काय कथा किटक न्याये, असा गुरूंचा महिमा सांगणारा हा प्रासादिक ग्रन्थ आहे.
# guru mahima, # ramdas, #swami, #dashbodh #Guru, # jai shri ram, #ram